फटाक कारखान्यातील स्फोटाच्या सखोल चौकशीचे पालकमंत्री बावनकुळेंचे निर्देश

0

नागपूर : काटोल तालुक्यातील कोतवालबड्डी येथील एशियन फायर वर्क्स बारूद कंपनीमध्ये स्फोट होवून या दुर्दैवी घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला. काहीजण जखमी झाले आहेत. या प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेतली असून सखोल चौकशी करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे जिल्हा प्रशासनाला दिले. प्रशासनातील सर्व सबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आहेत. बचाव आणि मदत कार्याबाबत मी प्रशासनाच्या संपर्कात राहून माहिती घेत आहे. या अपघातातील जखमींवर उपचार सुरू असून त्यांना प्रशासनातर्फे सर्वोतोपरी मदत केली जात आहे असे त्यांनी सांगितले. या घटनेत मृत्यू झालेल्या कामगार कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे पालकमंत्री बावनकुळे यांनी म्हटले आहे. जखमी कामगारांना उपचारात कोणतीही कमतरता पडू नये याची खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech