बेल्जियमच्या राजकुमारी अ‍ॅस्ट्रिड यांनी घेतली राज्यपालांची भेट

0

मुंबई : चार दिवसाच्या भारत भेटीवर आलेल्या बेल्जियमच्या राजकुमारी अ‍ॅस्ट्रिड यांनी आज एका उच्चस्तरीय शिष्टमंडळासह राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेतली. जवळपास अर्धातास चाललेल्या या बैठकीमध्ये उद्योग, व्यापार, हरित ऊर्जा, पर्यटन तसेच सांस्कृतिक संबंध वाढविण्यावर चर्चा झाली. बैठकीला बेल्जियमचे उपपंतप्रधान मॅक्सिम प्रिव्हो, बेल्जियमच्या फ्लॅन्डर्स प्रांताचे वित्तमंत्री मथायस डिपेंडेल, बेल्जियमचे भारतातील राजदूत डिडिएर व्हँडरहॅसेल्ट, मुंबईतील वाणिज्यदूत फ्रँक गीरकेन्स, राजकुमारीचे सल्लागार डिर्क वाउटर्स आणि ब्रेंट व्हॅन टॅसल उपस्थित होते. यावेळी राज्यपालांनी राजकुमारी अ‍ॅस्ट्रिड यांना राजभवनातील समुद्र किनारा दाखवला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech