नाशिक : नासिक मधील बागलाण विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार दिलीप मंगळू बोरसे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची रविवारी सभा झाली या सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, देशाला विश्वगुरू करायचे आहे आणि त्यासाठी म्हणून सर्वांनी सरकारच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे आज भारताकडे संपूर्ण जग अशाने बघत आहे आणि जगाची अशा पूर्ण करण्यासाठी भारताला काही निर्णय घ्यावे लागतील आणि मग पुढे जावे लागेल त्यासाठी जनता बरोबर असली पाहिजे जनतेने बरोबर राहिल्यावरती भारत विश्वगुरू होईलच परंतु संपूर्ण जगाला दिशा देण्याची ताकद देखील भारतामध्ये असेल. महाराष्ट्रात होत असलेली विधानसभेची निवडणूक ही फक्त निवडणुकाच नाही तर विकास आणि देशाला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी महत्त्वाची आहे त्यामुळे महायुतीचे उमेदवार विजयी करून द्यावे असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. या भाषणामध्ये गडकरी म्हणाले की भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त आणि विकास युक्त भारत करायचा असेल तर या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांना निवडून आणण्यासाठी म्हणून मतदान करा त्यांच्या बाजूने तन-मन-धनाने उभे रहा त्यांचा विजय हा विकसित राज्य आणि देशासाठी आहे.
भ्रष्टाचार मुक्त आणि विकसित देश आणि राज्य करण्यासाठी म्हणून महायुतीच्या उमेदवारांचा विजय हा महत्त्वाचा आहे जर हा विजय झाला तर सर्वसामान्य मतदारांची परिस्थिती सुद्धा सुधरेल त्यांचा सुद्धा विकास होईल त्यांची सुद्धा गरिबी दूर होईल आणि प्रगती होईल असा विश्वास व्यक्त करून ते पुढे म्हणाले की, संविधान बदलण्यासंदर्भात जे आरोप केले गेले ते मुळात चुकीचे आहे कोणत्याही अभ्यास न करता असे आरोप करणं हे खोटा निगेटिव्ह सेट करण्यासारखे आहे वास्तविकरित्या अनेक वर्षांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी संसदेला संविधानामध्ये कोणताही बदल करता येणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे आणि तसेच सांगितले देखील आहे त्यामुळे कोणीही आले कोणतेही सरकार आले तरी संविधान मध्ये बदल केला जाऊ शकत नाही जात धर्म पंथ हे कायम ठेवूनच संविधानाचा वापर करावयाचा आहे त्यामुळे आत्तापर्यंत जो प्रचार चालू आहे तो चुकीच्या असल्याचे सुद्धा त्यांनी यावेळी सांगितले.