रांची – झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी आज, शुक्रवारी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचा भाजपप्रवेशामुळे झारखंड मुक्ती मोर्चाला मोठा धक्का मानला जातोय. 28 जागांपैकी भाजपला फक्त दोनच जागा मिळाल्या होत्या. झारखंडमध्ये अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या लोकसभेच्या पाचही जागांवरही भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळेच आता चंपाई सोरेन यांच्यासारखे नेते भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात. रांची येथील शाखेच्या मैदानावर चंपई सोरेन यांच्या पक्षप्रवेशासाठी भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंचावर निवडणूक प्रभारी शिवराज सिंह चौहान, निवडणूक सहप्रभारी हिमंता बिस्वा शर्मा, प्रदेशाध्यक्ष बाबू लाल मरांडी आणि झारखंड भाजपचे सर्व नेते उपस्थित होते. यावेळी मंचावर चंपाई सोरेन यांचा मुलगा बाबूलाल सोरेनदेखील उपस्थित होते.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना एका आर्थिक खटल्यात तुरुंगात जावे लागले होते. यामुळे त्यांनी चंपई यांच्याकडे राज्याचे नेतृत्व सोपवले. पण, पाच महिन्यानंतर जामीन मिळताच ते चंपाई यांना बाजुला सारत मुख्यमंत्रिपदावर बसले. या निर्णयामुळे चंपई सोरेन खूप नाराज होते. झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी चंपाई सोरेन भाजपसाठी खुप फायद्याचे ठरू शकतात. चंपाई सोरेन हे शिबू सोरेन यांच्यासह झारखंड चळवळीचे एक मजबूत नेते आहेत. राज्यातील अनेक विधानसभा जागांवर त्यांचा प्रभाव आहे. यामध्ये कोल्हाण प्रदेश प्रमुख आहे. झारखंडमधील विधानसभेच्या 81 जागांपैकी 28 जागा आदिवासी समाजासाठी राखीव आहेत. 2019 च्या निवडणुकीत भाजपची कामगिरी निराशाजनक होती.