मुंबई – देशातील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे पंतप्रधानांसह दिग्गज नेते, मंत्री आणि पदाधिकारीही प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. मात्र, यंदाच्या निवडणुकीत देशातील संविधानाच्या मुद्द्यावरुन चांगलेच राजकारण तापले आहे. मोदी तिस-यांदा पंतप्रधान झाले तर संविधान बदलतील, असा आरोप विरोधी पक्षाकडून, इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनही यावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
काहीही झाले तरी संविधान बदलले जाणार नाही, स्वत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जरी आले तरी संविधान बदलले जाणार नाही, असेही मोदींनी म्हटले आहे. त्यामुळे, संविधान हा मुद्दा यंदाच्या राजकारणात सर्वात अग्रस्थानी दिसून येत आहे. कर्नाटकमधील भाजपा खासदाराने केलेल्या विधानामुळेच हे वातावरण पेटले आहे. मात्र, भाजपाने आता या खासदार महाशयांचे तिकीट कापले आहे.
मुंबई : देशातील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे पंतप्रधानांसह दिग्गज नेते, मंत्री आणि पदाधिकारीही प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. मात्र, यंदाच्या निवडणुकीत देशातील संविधानाच्या मुद्द्यावरुन चांगलेच राजकारण तापले आहे. मोदी तिस-यांदा पंतप्रधान झाले तर संविधान बदलतील, असा आरोप विरोधी पक्षाकडून, इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनही यावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे.