नवी दिल्ली – दिल्लीतील आम आदमी पार्टीचे सरकार बरखास्त करण्यात यावे अशी मागणी स्थानिक भाजप आमदारांनी केलीय. यासंदर्भात या आमदारांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. राष्ट्रपती सचिवालयाने या निवेदनाची दखल घेतली आहे. दिल्लीच्या भाजप आमदारांनी घटनात्मक संकटाचा हवाला देत दिल्लीचे सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात असल्याचाही या पत्रात उल्लेख आहे. राष्ट्रपती कार्यालयाने हे पत्र केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवले आहे. अशा स्थितीत राजधानी दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात रंगली आहे. भाजप आमदारांचे हे निवेदन राष्ट्रपती सचिवालयाने केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेय.