नागपूर : विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय महाराष्ट्राला नवी दिशा देणारा ठरेल असे प्रतिपादन मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी केले. नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. याप्रसंगी मोहन यादव म्हणाले की, भाजप सरकारने नेहमीच धर्म, सत्य, आणि न्यायाच्या मूलभूत मूल्यांवर आधारित कार्य केले आहे. राज्यातील महायुती सरकारने गरीब, शेतकरी आणि महिला कल्याणासाठी महत्त्वाची पावले उचलली आहेत. आर्थिक विकासासोबतच जनतेचे जीवनमान सुधारणे हे भाजपचे ध्येय आहे. त्यामुळे भाजपा सरकारचे उद्दिष्ट प्रत्येक नागरिकाला न्याय आणि समता मिळवून देण्याचे आहे. हे सरकार केवळ विकासाच्या दिशेने काम करत नाही तर संस्कृती, परंपरा, आणि आध्यात्मिक मूल्यांचे संरक्षण करत लोकांना आपले वैभवशाली इतिहास आणि संस्कृतीची जाणीव करून देत आहे.
भारतीय समाजाला नवसंजीवनी दिली आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा दिल्याचे डॉ. मोहन यादव यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारताचे घटनेचे शिल्पकार नव्हे, तर सामाजिक न्याय आणि समानतेचे एक महान पुरस्कर्ते होते. पुढे ते म्हणाले की, त्यांनी यावेळी बावनकुळे यांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपा-महायुतीचे सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. येत्या दोन वर्षांत कामठी शहर मेट्रोने जोडले जाणार आहे. या भागाच्या विकासासाठी प्रयत्न निरंतर सुरू राहणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे म्हणाल्या की, आम्ही दलित समाजाचा भाजपाला नेहमी विरोध राहिला. मात्र, नंतर लक्षात आले की, भाजप हा जात, पात, धर्म, भेद न मानणारा पक्ष आहे आणि दलितांचे रक्षण करणारा एकमेव पक्ष आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे सर्व समाजासाठी आदर्शवत नेतृत्व आहे. महाराष्ट्रातील चौदा कोटी जनतेच्या कल्याणासाठी काम करणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांनी कधीच जात, पात, धर्मभेद पाळला नाही. त्यामुळे सर्व जाती-धर्माचे लोक त्यांचा सन्मान करतात आणि त्यांचे नेतृत्वात काम करतात. कामठी विधान सभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी त्यांना विधानसभेत पाठवणे आवश्यक असल्याचे कुंभारे यांनी सांगितले.