नवी दिल्ली – बेंगळुरूहून सॅन फ्रान्सिस्कोला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात निष्काळजीपणाचे प्रकरण समोर आले आहे. फ्लाइटमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या जेवणात ब्लेड सापडले. एअरलाननेही आपली चूक मान्य केली आहे.
यासंदर्भात जारी केलेल्या निवेदनात एअर इंडियाने म्हंटले आहे की, बेंगळुरूहून सॅन फ्रान्सिस्कोला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात निष्काळजीपणाचे प्रकरण समोर आले आहे. फ्लाइटमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या जेवणात ब्लेड सापडले. एअरलाननेही आपली चूक मान्य केली आहे. एअरलाइनचे मुख्य ग्राहक अधिकारी राजेश डोगरा यांनी सांगितले की, आमच्या एका फ्लाइटमध्ये बसलेल्या पाहुण्यांच्या जेवणात वस्तू आढळून आली आहे. तपासाअंती असे आढळून आले की ते आमच्या केटरिंग पार्टनरच्या सुविधांमध्ये वापरल्या जाणाऱ्या भाजीपाला प्रक्रिया मशीनमधून आले आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी उपाययोजना मजबूत करण्यासाठी आम्ही आमच्या खानपान भागीदारांसोबत जवळून काम केल्याचे एअर इंडियाने स्पष्ट केलेय.