जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानी घुसखोराला कंठस्नान

0

जम्मू : जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर सतर्क असलेल्या सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) शुक्रवारी रात्री उशिरा पाकिस्तानकडून झालेला घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. आरएस पुरा सेक्टरमधील अब्दुलियन भागात बीएसएफच्या जवानांनी एका पाकिस्तानी घुसखोराला ठार केले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. यासंदर्भात बीएसएफने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा सैन्याच्या तुकडीला 4 आणि 5 एप्रिलच्या मध्यरात्री आंतरराष्ट्रीय सीमारेषेजवळ संशयास्पद हालचाली दिसून आल्या. एका व्यक्तीने भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. त्याला बीएसएफ जवानांनी अनेक वेळा इशारा देऊनही आणि गोळीबार करूनही घुसखोर माघारी परतला नाही. यामुळे सुरक्षा दलाने गोळीबार करून त्याला ठार केले. या घुसखोराची ओळख पटवली जात आहे. बीएसएफने सीमेपलीकडून झालेल्या घुसखोरीच्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. या घटनेची अधिकारी अधिक चौकशी करत आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech