‘महाकुंभ’ला जाणार्‍या बस, रेल्वेगाड्या फुल्ल

0

पुणे : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक जात आहेत. त्यांच्यासाठी रेल्वेकडून नियमित गाड्यांव्यतिरिक्त अतिरिक्त विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, महाकुंभला जाण्यासाठी प्रवाशांचा वाढता प्रतिसाद यामुळे रेल्वेच्या सर्वच्या सर्व गाड्या फुल्ल झाल्या आहेत. त्यामुळे अनेकांना आपली खासगी चारचाकी गाडी करून प्रयागराजच्या दिशेने प्रवास करावा लागत आहे. अशीच स्थिती पुणे विभागाची देखील आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे १४४ वर्षांतून एकदा येणार्‍या कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी पुण्यासह देशभरातून जाणार्‍या नागरिकांची संख्या मोठी आहे. लांबच्या प्रवासासाठी सर्वसामान्य लोक परवडणार्‍या रेल्वेप्रवासाला पसंती देतात. त्यामुळे रेल्वेगाड्या फुल्ल झाल्या आहेत. प्रवाशांना ऑनलाइन तिकिटे सध्या उपलब्धच नाहीत. तिकिटे मिळणे तर सोडाच, साधी वेटिंग तिकिटे देखील प्रवाशांना मिळत नाहीत. संकेतस्थळावर रिग्रेट असा ऑप्शन येत असून, तिकिटे उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे पुणेकर प्रवासी हैराण झाले असून, अतिरिक्त रेल्वेगाड्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech