मुंबई – जळगांव आणि यवतमाळ जिल्ह्यातील दोन सूतगिरणींना सहाय्य करण्यास आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. अशी माहिती वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. जळगाव जिल्ह्यातील शामाप्रसाद मुखर्जी सहकारी सूतगिरणी मर्या. शेंदुर्णी (ता. जामनेर) ही सूतगिरणी एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण, 2023-28 नुसार झोन 2 मध्ये येत असल्याने तिची 10:40:50 या अर्थसहाय्याच्या गुणोत्तरानुसार निवड करण्यात आली. तर बाबासाहेब नाईक कापुस उत्पादक सहकारी सुतगिरणी मर्या., पिंपळगांव (कान्हा), ता.महागांव, जि.यवतमाळ या सूतगिरणीकडील शासकीय भागभांडवल व शासकीय कर्जाची थकित रक्कम रुपये ६८.९५ कोटी परतफेड करण्यासाठी हप्ते पाडून देण्यास मान्यता देण्यात आली.