नारायण राणे यांची खासदारकी रद्द करा; राऊतांची निवडणूक आयोगाकडे मागणी

0

मुंबई – रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी गैरमार्गाचा वापर करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेला आहे. त्यामुळे त्यांची निवड रद्द करावी. यासोबतच राणे यांच्यावर पाच वर्षे निवडणूक लढविण्यास आणि मतदान करणण्यास बंदी घालावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. विनायक राऊत यांनी ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांच्यामार्फत निवडणूक आयोगाला नोटीस पाठवून ही मागणी केली आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे आणि विनायक राऊत आमने-सामने होते. गटा-तटाच्या लढतीत या निवडणुकीत राणे यांनी विनायक राऊत यांचा पराभव केला होता. मात्र, राणेंनी पैशाच्या जोरावर विजय मिळवला असल्याचा आरोप ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.

५ मे रोजी निवडणूक प्रचार संपला असता भाजप कार्यकर्ते ६ मे रोजी सुद्धा नारायण राणे यांचा प्रचार करत होते. तर राणे समर्थक मतदारांना पैसे देत असल्याचे व्हीडीओही सर्वत्र प्रसारित झाल्याचे निवडणूक आयोगाला पाठवलेल्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. दरम्यान आयोग या प्रकरणावर कोणता निर्णय घेतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech