उमेदवारांना 18 तारखेच्या संध्याकालपासून जाहिरात करता येणार नाही

0

जळगाव : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या अनुषंगाने वर्तमान पत्रात 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी भारत निवडणूक आयोगाने राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करण्याचे निर्देश दिले आहे. २०२४ मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या एक दिवसापुर्वी प्रिंट माध्यमांमधून कोणत्याही भडकाऊ, दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेला खीळ बसले अशा जाहिराती प्रकाशित होऊ नये, याबाबत दक्षता घेण्याच्या सुचना निवडणुक आयोगाकडून देण्यात आल्या आहेत. कोणताही राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूका, २०२४ मतदानाच्या दिवशी म्हणजेच २० नोव्हेंबर आणि मतदानाच्या एक दिवस आधी १९ नोव्हेंबर रोजी प्रिंट मिडीयामध्ये कोणतीही राजकीय जाहिरात, जोपर्यंत राज्य/जिल्हा स्तरावरील माध्यम पूर्व प्रमाणिकरण समितीकडून (MCMC) पूर्व-प्रमाणित केली जात नाही, तोपर्यंत वृत्तपत्रात प्रकाशित करुन नये. तसेच राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांना उक्त कालावधीत प्रिंट मिडीयामध्ये राजकीय जाहिरात द्यावयाची झाल्यास, अर्जदारांनी सदर जाहिरात प्रकाशित करण्याच्या प्रस्तावित तारखेच्या दोन दिवस आधी MCMC समितीकडे अर्ज करावा लागेल, अशा सूचना देण्यात आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन निवडणूक आयोगाचे अवर सचिव व उप मुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यांनी केले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech