नाशिक : कळवण तालुक्यामध्ये बांगलादेशी शेतकऱ्यांनी शेतकरी पीक विम्याचा लाभ घेतल्याची घटना समोर आली होती या प्रकरणी तालुका कृषी अधिकारी यांनी पोलीस ठाण्यामध्ये १८१ बोगस शेतकऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामुळे चांगलीच खळब उडाली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत याबाबत अधिक माहिती अशी की नुकत्याच अलीकडच्या काळामध्ये भाजपाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कळवण भागाचा दौरा करून या ठिकाणी बांगलादेशी नागरिकांनी या ठिकाणी बोगस शेतकरी असल्याचे बसवून शासनाच्या पंतप्रधान किसान विमा योजनेचा लाभ घेतल्याची माहिती कृषी अधिकारी तसेच स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये दिली होती यानंतर या सर्व प्रकरणाचा तपास करण्यात आला आहे . मालेगाव मध्ये बांगलादेशी नागरिकांनी विरोधात किरीट सोमय्या यांचे आंदोलन सुरूच आहे आणि त्यानंतर त्यांनी या प्रकरणावरती आपलं लक्ष केंद्रित केलं होतं. बाबत कळवणच्या तालुका कृषी अधिकारी मिलन म्हस्के यांनी कळवण पोलीस ठाण्यामध्ये भादवी ४१/७,४६५/४६ या कलमान्वये पंतप्रधान किसान विमा योजनेचा सुमारे १८१शेतकऱ्यांनी लाभ घेऊन शासनाची दोन कोटी ९८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे यामध्ये जे आरोपी आहेत त्यांनी प्रत्यक्ष दर्शनी शेतकरी नसल्याचे समोर आल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे पोलीस या प्रकरणी तपास करीत असून हे सर्व नागरिक हे बांगलादेशी असल्याचे निदर्शनास प्रथमदर्शनी आल्याचे देखील पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टेंभेकर हे अधिक तपास करीत आहेत