केंद्र सरकार लवकरच ओला, उबेरसारखी टॅक्सी सेवा सुरु करणार

0

नवी दिल्ली : केंद्र सरकार लवकरच ओला, उबेरसारखी टॅक्सी सेवा सुरु करणार आहे. सहकारी टॅक्सी सेवा लवकरच सुरु केली जाणार असल्याची घोषणा गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत केली. अमित शहा म्हणाले, ‘सहकारातून समृद्धीचा नारा हा केवळ एक नारा नाही तर आम्ही तो प्रत्यक्षात अंमलात आणला आहे. काही महिन्यांत सहकारी टॅक्सी सेवा येत आहे. ही सहकारी सेवा चारचाकी वाहने, ऑटो आणि दुचाकी वाहनांची नोंदणी करेल. या सेवेत नोंदणी केल्यानंतर, संपूर्ण फायदा थेट ड्रायव्हरला मिळेल. मोठा भाग कोणत्याही श्रीमंत माणसाच्या हातात जाणार नाही.पुढे बोलताना ते म्हणाले की, उबर आणि ओला सारख्या कंपन्यांच्या सहकार्याने टॅक्सी चालवणाऱ्या चालकांना त्यांच्या कमाईचा काही भाग द्यावा लागतो. सबस्क्रिप्शन फी भरावी लागते आणि ड्रायव्हर्सना प्रत्येक राईडवर कंपनीला एक निश्चित कमिशन देखील द्यावे लागते.मात्र, आता सहकारी सेवांमुळे यातून मिळणारा संपूर्ण नफा थेट ड्रायव्हरला जाईल आणि त्याच्याकडून कोणतेही कमिशन घेतले जाणार नाही.

सहकारी टॅक्सी सेवांमुळे, दिल्ली, मुंबई, लखनौ, पटना, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद आणि बेंगळुरू सारख्या शहरांमध्ये वाहतूक व्यवस्थेत मोठी सुधारणा होऊ शकते. आतापर्यंत लोकांना ओला आणि उबर सारख्या टॅक्सी सेवांवर अवलंबून राहावे लागत होते. सुरुवातीच्या टप्प्यात, या टॅक्सी सेवांमुळे चालकांना खूप फायदा झाला. परंतु आता कंपन्यांनी त्यांचे कमिशन वाढवले ​​आहे. अशा परिस्थितीत, टॅक्सी सेवेतून होणाऱ्या नफ्यात चालकांचा वाटा लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. याकडे लक्ष वेधत अमित शहा म्हणाले की, आता टॅक्सी सेवेचा नफा श्रीमंतांकडे जाणार नाही तर त्याचा पूर्ण फायदा चालकांना मिळेल.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech