नाशिक : महाराष्ट्रातील एक शक्तीपिठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील वनी येथील सप्तश्रुंग देवीचा चैत्रोत्सव प्रारंभ होत असल्याने आदिशक्ती भगवतीच्या पुण्य पावन नगरीत चैत्रोत्सव दरम्यान होणारी गर्दीच्या अनुषंगाचे आढावा घेत प्रशासन सज्ज होताना दिसून येत आहे. नंदुरबार धुळे शिरपूर तसेच संपूर्ण जगभरात आई सप्तशृंगी चरणी लाखो भाविक हजेरी लावतात. या यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा मिळावी म्हणून सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट, तसेच सप्तशृंगी गड ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन, महामंडळ सेवा, महावितरण कंपनी, रोपवे ट्रॉली, वन विभाग, आपत्ती विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, आपआपली जबाबदारीने पार पाडावे, असे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिलेला आहे. मात्र, भाविकांना अजून सुविधा कशी द्यावी याबाबत चर्चा देखील सुरू आहे.
त्याच अनुषंगाने सप्तशृंगी गडाचा विकास कामाचा आराखडा सदर जिल्हाधिकारी यांनी घेतला असून भाविकांना मूलभूत सुविधा मिळावे याबत प्रशासन लक्ष घालत आहे. तसेच अनेक दुकानदारांनी श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर यात्रेसाठी आप आपली दुकाने थाटली आहे. रस्त्याच्या मध्यभागी भव्य दिव्य पथदिवे लावून सप्तशृंगीगड हे सुशोभीकरण दिसून येत आहे.तसेच यात्रा कालावधीत खाजगी वाहनाचा प्रवेव बंद असुन यासाठी नांदुरी ग्रामपंचायत वाहनतळाची व्यवस्था करत असते व येणाऱ्या भाविकांना परीवहन महामंडळाच्या एस टी बसने प्रवास करावा लागतो.