चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात येणाऱ्या परदेशी पाहुण्यांच्या अपहरणाचा कट

0

लाहोर : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या यजमानपदाखाली आयोजित करण्यात आली आहे आणि भारतीय संघाचे सामने वगळता सर्व सामने पाकिस्तानातील तीन स्टेडियम्सवर खेळवले जाणार आहेत.अशातच आता चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी पाकिस्तानात येणाऱ्या परदेशी पाहुण्यांचे अपहरण करण्याचा कट आखला जात आहे, असा इशारा पाकिस्तानच्या गुप्तचर विभागाने जारी केला आहे.

इस्लामिक स्टेट खोरासान प्रांत (ISKP) कडून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी पाकिस्तानात येणाऱ्या परदेशी पाहुण्यांचे अपहरण करण्याचा कट आखला जात आहे. यामध्ये परदेशी विशेषतः चिनी आणि अरब नागरिकांचे खंडणीसाठी अपहरण करण्याची योजना ISKP आखत आहे. या देशांमधून येणाऱ्या पर्यटकांसाठी वारंवार वापरल्या जाणाऱ्या बंदरे, विमानतळ, कार्यालये आणि निवासी क्षेत्रांवर पाळत ठेवत आहे.

गुप्तचर अहवालांनुसार, ISKP चे कार्यकर्ते शहरांच्या बाहेरील भागात घरं भाड्यानं घेण्याची योजना आखत आहेत. जिथे CCTV कॅमेरे नाहीत आणि फक्त रिक्षा किंवा मोटारसायकलने पोहोचता येणारी ठिकाणे निवडत आहेत. पाकिस्तानी सुररक्षा दलांपासून वाचण्यासाठी रात्रीच्या वेळेस अपहरण करून त्या व्यक्तींना या घरांमध्ये हलवण्याचा या संघटनेचा मानस आहे. अफगाणिस्तानच्या गुप्तचर संस्थेने (GDI) अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या ठिकाणांवर ISKP च्या संभाव्य हल्ल्यांबद्दल सतर्क केले आहे आणि गटाशी संबंधित बेपत्ता कार्यकर्त्यांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न वाढवले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech