त्र्यंबकेश्वर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी भेट दिली पाहणी देखील केली.या भेटीत त्यांनी सर्वप्रथम त्र्यंबकेश्वराचे गर्भगृहात जाऊन दर्शन घेतले. मंत्री गिरीश महाजन त्यांच्या समावेत होते. दोन्ही मंत्र्यांनी सोवळे नेसले होते. दर्शनानंतर कुशावर्त तीर्थ येथे त्यांनी भेट दिली यावेळी जिल्हाधिकारी यांनी तीर्थराज कुशावार्तावरील सिंहस्थातील नियोजना संदर्भात माहिती दिली. दरम्यान त्रंबकेश्वर मंदिरातील आवारातील सत्संग पेंडॉलमध्ये साधुनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
मुख्यमंत्र्यांनी कुंभमेळ्याचा कारभार स्वतःकडे ठेवावा अशी मागणी साधूनी करून त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्यासंदर्भात बैठक त्रंबकेश्वर घ्यावी अशी जोरदार मागणी यावेळी केली. काही मंडळी बाबत तक्रारी देखील मांडल्या. या.वर मी स्वतः त्र्यबकेश्वरच्या साधू महंतांचे संपर्कात राहील असे आश्वासन या साधूंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. जवळपास ३० साधू उपस्थित होते. आनंद आखाडा राष्ट्रीय अध्यक्ष स्वामीशंकरानंद सरस्वती मी पंचदशनाम जुनाआखाडा महामंडलेश्वर शिवगिरी महाराज निरंजनी आखाड्याचे ठाणापतीधनंजय गिरी महाराज यांनी त्रंबकेश्वर मध्ये बैठक घ्यावी असे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले यावेळी सर्व आकडेचे साधू उपस्थित होते.
आयुक्त प्रवीण गेडाम तसेच महसूल विभागाचे अधिकारी व प्रशासक्र श्रीया देवचके उपस्थित होत्या. नाशिक जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी मोठा पोलीस बंदोबस्त यावेळी ठेवला होता. त्रंबकेश्वर देवस्थान च्या वतीने विश्वस्त कैलास घुले व सहकारी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी भाजप स्थानिक व जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्र्यंबकेश्वर च्या पुरोहितांनी दोन्ही मंत्र्यांना विजयी भवचा आशीर्वाद दिला. महंत महेंद्रगिरी महंत दयानंद भारती महंत जयदेवगिरी महंत गोपालदास महंतअजयपुरी महंत कैलाश भारती महंत अनंतपुरीजी मनसापुरी दिपेंद्र गिरी महंतठाणापती शांतिगिरी महाराज उपस्थित होते .