मुख्यमंत्री फडणवीस यांनी श्री तुळजाभवानी देवीचे घेतले दर्शन

0

धाराशिव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्री क्षेत्र तुळजापूर येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीची विधिवत पुजा करून दर्शन घेतले. यावेळी मंदिर प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी कवड्याची माळ घालून स्वागत केले. श्री फडणवीस यांनी यावेळी भवानी शंकराचे दर्शन घेतले. तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धार व ऐतिहासिक स्तंभ कलाकृतीचे अनावरण केले.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या समवेत मित्राचे उपाध्यक्ष तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष व पोलीस अधीक्षक संजय जाधव उपस्थित होते. फडणवीस यांनी मंदिर परिसरात पुरातत्व विभागाकडून सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. तसेच मंदिराच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराची पाहणी केली व उपस्थितांशी संवाद साधला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech