मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत जर कोणी भ्रष्टाचार करत असेल तर त्याला शिवसेना स्टाईल उत्तर दिले जाईल – डॉ. नीलम गोऱ्हे

0

 *शासकीय योजनांची डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती

पुणे – शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज शासकीय योजनांबाबत माहिती देण्यासाठी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. पुण्यातील सारसबाग रोडवरील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय इथे आज दि.२० जुलै रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनात राबविल्या जाणाऱ्या शासकीय योजनांची माहिती यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी अधिवेशनात सभागृहात मांडलेल्या लक्षवेधी आणि सूचना यांची माहिती दिली.तसेच सरकार अमली पदार्थ विक्रेत्यांवर कठोर कारवाई करत आहे असे ही त्यांनी स्पष्ट केले.या प्रसंगी बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी शिवसेनेची सभासद नोंदणी मोहीम जोरात सुरू असून, आतापर्यंत पुण्यात २५ हजार सभासद नोंदणी झाले असल्याचे नमूद केले.

डॉ. गोऱ्हे यांनी विधिमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकांची माहिती दिली. यामध्ये कॉपी विरोधात विधेयक आणि ६ महिन्याच्या आत कुठलाही विकास आराखडा मंजूर करावा असे विधेयक मंजूर केले आहे अशी माहिती डॉ. गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच,मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत जर कोणी भ्रष्टाचार करू पाहत असेल, तर त्याला शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल असा इशारा यावेळी त्यांनी दिला.

यावेळी अनेक महिलांनी मोठ्या संख्येने शिवसेनेत डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रवेश केले. यावेळी सर्व शिवसेना पदाधिकारी, महिला व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

यावेळी शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, महिला शहर सुदर्शना त्रिगुणाईत , सुधीर कुरूमकर, सुधीर जोशी, उपशहर प्रमुख विकी माने, सुनिल जाधव, उपजिल्हा प्रमुख अमर घुले, महिला आघाडी शहर प्रमुख सुरेखा पाटील, श्रुती नाझिरकर, श्रद्धा शिंदे व नेहा शिंदे, महिला आघाडी उपशहर प्रमुख जयश्री मोरे, स्मिता साबळे, सारिका पवार, राजश्री माने, प्रतिमा बोबडे, धनंजय जाधव, महेंद्र जोशी, पंकज कोद्रे, शीतल गाडे, आशा यादव व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech