रत्नागिरी – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह इतर विकासकामांचा शुभारंभ करण्यात येणार त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार येत्या २१ ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. अशी माहिती यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लाडकी बहीण योजनेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित रत्नागिरीत शुभारंभ होणार आहे. येत्या २१ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम होणार आहे. तत्पूर्वी जिल्ह्यातील पाच हजार महिलांना एकत्र आणले जाणार असून, हा कार्यक्रम १७ ऑगस्ट रोजी होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात २१ रोजी रत्नागिरी विमानतळ टर्मिनलच्या कामाचा प्रारंभ होणार आहे. सुमारे शंभर कोटी रुपयांचे हे काम आहे. त्याचप्रमाणे इंजिनिअरिंग कॉलेजच्या इमारतीचे उद्घाटन होणार असून, या कॉलेजला लोकनेते स्व. श्यामरावजी पेजे यांचे नाव दिले जाणार असल्याचेही माहिती उदय सामंत यांनी दिली.