सीएसआरच्या माध्यमातून देशभरात सामाजिक परिवर्तनाला चालना मिळाली : राज्यपाल बैस

0

मुंबई  – कॉर्पोरेट क्षेत्राने सामाजिक दायित्व क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा नियम अमलात आल्याला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. कॉर्पोरेट क्षेत्राने समाज ऋणाची परतफेड करण्याच्या वाटेवरील हा एक मैलाचा दगड पार झाला आहे. या दशकभरात सामाजिक दायित्व क्षेत्रात गुंतवणूक हा कॉर्पोरेट धोरणाचा एक महत्त्वाचा हिस्सा बनला आहे आणि यातूनच देशभरात सामाजिक परिवर्तन आणि विकास याला चालना मिळाली आहे, असे गौरवोद्गार राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी काढले. भारतात “सामाजिक दायित्व क्षेत्रात गुंतवणूक” नियमाची दशकपूर्ती निमित्तच्या या पुरस्कार वितरण सोहळ्याचे निमित्ताने राज भवनात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस या सोहळ्याचे प्रमुख अतिथि होते, तर नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी, भारतीय सामाजिक दायित्व दशकपूर्ती आयोजन मंडळ अध्यक्ष हुजाइफा खोराकीवाला अतिथी म्हणून उपस्थित होते. या सोहळ्यात कॉर्पोरेट क्षेत्राच्या सामाजिक दयित्वाच्या बांधीलकीचा गौरव करण्यात आला.

यावेळी कैलास सत्यार्थी यांनी सामाजिक दायित्व विषयक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, सामाजिक दायित्व ही धर्मादाय कृती नाही, ती न्यायाची वाट दाखवते आणि प्रत्येक व्यक्तीचा आत्मसन्मान आणि हक्क यांचा आदर करते. सामाजिक दायित्व अशा एका जगाच्या निर्मितीच्या दिशेने केलेला प्रवास आहे ज्यात एकही बालक शिक्षणाला मुकणार नाही, आणि एकही मानवसमूह मागास राहणार नाही

पुरस्कार वितरणाबरोबरच या समारंभात “भारतीय CSR के दस साल: अगले दस साल बेमिसाल” या पुस्तकाचे प्रकाशन झाले. जीवन गौरव पुरस्कार विजेते डॉ. भास्कर चटर्जी आणि डॉ. नयन मित्रा हे या पुस्तकाचे लेखक आहेत.

“गेल्या दहा वर्षात सामाजिक दायित्व क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या कंपन्यांच्या कामाचा गौरव या पुरस्कारांतून होतो. त्यांचे कष्टप्रद आणि निस्वार्थी कार्य अत्यंत मौल्यवान आहे,” असे विचार हुजाइफा खोराकीवाला, यांनी व्यक्त केले. कंपन्यांनी सामाजिक दायित्व क्षेत्रात केलेल्या कामगिरीची दखल घेणे तसेच या क्षेत्राबद्दलची

कॉर्पोरेट क्षेत्रातील दिग्गज उपस्थित

सामाजिक विकासाची जाणीव करून देणा-या या सोहळ्याला कॉर्पोरेट क्षेत्रातील अजंठा फार्मा, कोल इंडिया, गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड , हिंदुस्तान युनिलिव्हर , आय टी सी , आयुर्विमा महामंडळ, महिंद्र अँड महिंद्र, नवनीत एज्युकेशन, एन टी पी सी , पेट्रोनेट एल एन जी, स्टेट बँक अशा नामवंत कंपन्यांचे सर्वोच्च पदांवरील अधिकारी आवर्जून उपस्थित होते. त्यांनी पुरस्कार स्वीकारले आणि त्यांच्या कंपन्यांच्या सामाजिक दायित्व प्रकल्पांची माहिती दिली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech