पुणे : स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रेय गाडे याची पुन्हा पोलिस कोठडी मिळावी, त्यासाठी गुन्हे शाखेने केलेला अर्ज न्यायालयाने आज फेटाळला. पोलिसांनी अर्जात पुन्हा पोलिस कोठडी मिळण्याबाबत ठोस कारण दिले नसल्याने न्यायालयाने अर्ज फेटाळून लावला.या गुन्ह्यात गाडेला २८ फेब्रुवारीला अटक केल्यानंतर त्याला १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. याबाबत एका २६ वर्षीय तरुणीने स्वारगेट पोलिस ठाण्यात अत्याचार झाल्याची तक्रार दिली होती.
दरम्यान पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला व उसाच्या शेतात लपून राहिलेल्या गाडेला २८ फेब्रुवारीला रात्री सव्वा एकच्या सुमारास अटक केली होती.त्याच्यावर त्याच्यावर यापूर्वी सहा लूटमारीचे गुन्हे देखील दाखल असल्याचे पोलिस तपासात समोर आले होते. त्याला अटक झाल्यानंतर त्याच्या वैद्यकीय चाचणी बरोबर डीएनए नमुने घेण्यात आले आहेत.पोलिस कोठडीच्या दरम्यान त्याला घटनास्थळावर नेण्यात आले होते. तो ज्या शेतात लपून बसला होता त्या शेताची पाहणी करून पुरावा गोळा करण्यात आले. या दरम्यान तो ज्यांना ज्यांना भेटला त्यातील खटल्याच्या अनुषंगाने जबाब नोंदविण्यात आले आहेत.