‘रॉबिन हूड’च्या प्रमोशनसाठी डेव्हिड वॉर्नर हैद्राबादेत

0

हैद्राबाद : वेंकी कुदुमुला दिग्दर्शित आणि नितीन अभिनीत आणि श्रीलीलाच्या ‘रॉबिनहूड’ सिनेमात डेव्हिड वॉर्नर देखील एका विशेष भूमिकेत दिसणार आहे. वॉर्नर थेट क्रिकेटच्या मैदानावर मोठ्या पडद्यावर दिसणार असल्याने याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. अशातच डेव्हिड वॉर्नर या सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी सिनेमाच्या प्रमोशसाठी हैद्राबादमध्ये दाखल झाला आहे.

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिग्दर्शक वेंकी कुदुमुला आणि चाहत्यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेव्हिड वार्नरचे जोरदार स्वागत केले. HICC नोवोटेल, हैदराबाद येथे रॉबीनहूड हा सिनेमाचा प्री-रिलीज कार्यक्रम होणार असून सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळाही संपूर्ण टीमसोबत पार पडणार आहे. त्यामुळेच वार्नर सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीच प्रमोशन करण्यासाठी हैद्राबादला पोहोचला आहे. ‘रॉबिनहूड’ २८ मार्च रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमाचे जोरदार प्रमोशन करण्यात येत असून सिनेमाची मोठी चर्चा होत आहे. तसेच प्रेक्षकांमध्ये सिनेमा रिलीजची मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, ‘रॉबिनहूड’मध्ये वार्नर एका विशेष भूमिकते पाहायला मिळणार आहे.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरहीचे या सिनेमातून टॉलिवूडमध्ये पदार्पण मानले जात आहे. त्याच्या भूमिकेबाबत अद्याप फारशी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र प्रमोशनसाठी तो हैदराबादला पोहोचला आहे. रॉबिनहूड एक ॲक्शन-पॅक एंटरटेनर सिनेमा असून अभिनेता नितीनचे चाहते या सिनेमाला घेऊन खूप उत्सुक आहेत. या सिनेमात श्रीलीला मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech