हल्ल्यात जखमी झालेल्या सुबोध पाटील यांची एकनाथ शिंदे यांनी घेतली भेट

0

मुंबई : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेले रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कामोठे येथील रहिवाशी सुबोध पाटील हे सध्या श्रीनगर येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती जाणून घेतली आणि ते लवकरात लवकर पूर्ण बरे होऊन आपल्या घरी परतावे यासाठी लागेल ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech