कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्यासह 14 जणांची अनामत रक्कम जप्त

0

अमरावती : विधानसभा निवडणुकीत वैध मतांच्या तुलनेत १/६ मते न मिळालेल्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त केली जाते. दर्यापूर मतदार संघात थेट निवडणूक लढविणाऱ्या एकूण १६ उमेदवारांपैकी १४ जणांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. यात शिंदे शिवसेनेचे कॅप्टन अभिजित अडसूळ यांचाही समावेश असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. दर्यापूर मतदार संघात २ लाख ८ हजार ५५० मतदारांनी हक्क बजावला. विजयी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार गजानन लवटे यांना ८७ हजार ७४९ मते मिळाली तर दुसऱ्या क्रमांकाची ६८ हजार ४० मते युवा स्वाभिमानी पार्टीचे उमेदवार माजी आमदार रमेश बुदेले यांना मिळाली. तर शिंदेसेनेचे उमेदवार अभीजीत अडसूळ यांना २३ हजार ६३२ मते मिळाली. या मतदारसंघात माजी खासदार नवनीत राणा वर्सेस शिवसेनेचे अभिजित अडसूळ असा सामना बघायला मिळाला. या दोन्ही नेत्यांच्या स्पर्धेत उबाठा गटाचे उमेदवार गजानन लवटे यांना ८७ हजार ७४९ मते मिळवत विजय संपादित केला.

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार १/ ६ अर्थात १६.६६ टककेपेक्षा कमी मते मिळालेल्या उमेदवारांची अनामत जप्त केली जाते. यात शिंदेसेनेचे उमेदवार अभिजीत अडसूळ यांना ११.३३ टक्के मते असल्याने त्यांचीही ५ हजार रुपयांची अनामत जप्त होईल. तसेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अंकुश वाकपांजर, प्रहार जनशक्ती पार्टी अरुण वानखडे, बहुजन समाज पार्टी नागोराव हंबर्डे, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक) नाजुक चौरपगार, आरपीआय (ए) कैलास मोरे, जन जनवादी पार्टी सुमित्रा गायकवाड, अपक्ष उमेदवार डॉ. सुजाता आठवले, अॅड. संजय वानखडे, अॅड. राजू कलाने, निलेश राक्षसकर, रविकिरण तेलगोटे, कांचनमाला वानखडे, मनोहर चौथमल या सर्व उमेदवारांची अनामत जप्त होईल, अशी माहिती निवडणूक कार्यालयातून प्राप्त झाली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech