![]()
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिंदे यांना आपल्या निवासस्थानी स्नेह भोजनासाठी आमंत्रित केले होते. यावेळी सोबत उद्योग मंत्री उदय सामंत व तेथे मनसे नेते अमित ठाकरे, मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे, अमेय खोपकर, अभिजित पानसे हे देखील उपस्थित होते.