सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आंबोली-नांगरतास येथील ऊस संशोधन केंद्राला भेट दिली व तेथील नवनवीन ऊसाच्या प्रजाती बाबत माहिती घेतली. तत्पुर्वी, गेळे येथील ऊस संशोधन केंद्राच्या प्रगतीचा आढावा घेतला. तेथील रस्ते, पाणी याबाबत ही चर्चा केली. यावेळी मंत्री पवार म्हणाले, मागच्या वेळी मी कोल्हापूर दौऱ्यावर आलो होतो. त्यावेळीच आंबोलीला यायचे निश्चित केले होते. येथील ऊस संशोधन केंद्राची पाहाणी करून काहि निर्णय घ्याचे आहेत, असा माझा प्रयत्न असल्याचे पवार म्हणाले. त्यामुळेच आज भेट दिली. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात एआय चा वापर टप्याटप्याने करण्यावर सरकारचा भर राहिल, असे ही त्यांनी यावेळी सांगितले.