मुंबई – महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यपाल मा.श्री.रमेश बैस यांची दि. २७ जुलै रोजी मुंबईतील राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.
यावेळी डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आपल्या उपसभापती, महाराष्ट्र विधान परिषद या पदाच्या पंचवार्षिक कारकीर्दीचा अहवाल राज्यपालांना सादर केला. यामध्ये विविध विषयांचे अनुषंगाने घेतलेल्या बैठका,विधान परिषदेतील निर्देश,पास करण्यात आलेले कायदे तसेच ऊसतोड कामगार महिलांच्या अवैघरित्या काढण्यात येणाऱ्या पिशव्या बाबत शासनाने नेमलेल्या डॉ गोऱ्हे यांचे अध्यक्षतेखालील समितीचा अहवालातीस शिफारशींबाबत निर्देश यामध्ये समाविष्ट आहे.
याप्रसंगी डॉ.गोऱ्हे यांनी राज्यपाल श्री.रमेश बैस यांच्याशी राज्यातील अनेक सामाजिक विषयांवर चर्चा केली. यावेळी श्री बैस यांनी अहवाल पाहून डॉ गोऱ्हे यांचे कौतुक केले. उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मा राज्यपाल श्री रमेश बैस यांची राजभवन येथे घेतली सदिच्छा भेट घेतली.