नाशिक – धनगर समाजाच्या आदिवासी समाजामध्ये समावेश करू नये या मागणीसाठी विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवाळानी स्वतः आता सोमवारपासून मुंबईमध्ये उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली आहेराज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा आरक्षण वाद रंगला असतानाच, त्यापाठोपाठ आता आदिवासी विरुद्ध धनगर समाज असा वाद रंगला आहे. धनगर समाजाला आदिवासी कोट्यातून आरक्षण देण्यासंदर्भात मागणी होत आहे. मात्र, दुसरीकडे आदिवासी नेत्यांकडून, धनगर समाजा कडुन याला कडाडून विरोध आहे.
अशातच आता धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यास अजित पवार गटाचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी विरोध दर्शवत उपोषण करण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे.सरकारने धनगरांना आदिवासीतून आरक्षण देण्याचा जीआर काढण्याची भूमिका मागे घ्यावी तसेच पेसाभरती बाबत दिलेले आश्वासन पाळावे या मागणीसाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ सोमवार दिनांक 30 पासून मुंबईत मंत्रालया समोरील गांधी पुतळ्या शेजारी धरणे आंदोलनास बसणार आहे. यात सर्व आदिवासी आजी- माजी आमदार, विविध लोक प्रतिनिधी संघटना यांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. अशी माहिती झिरवाळ यांनी दिली आहे.