नवी दिल्ली – महाराष्ट्रातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बंदरांचा विकास केल्यास बंदरांच्या आजू बाजूच्या वस्त्यांचा विकास वेगाने होईल, या उद्देशाने मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी केंद्रीय जल वाहतूक मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची लोकसभेत भेट घेऊन निवेदन दिले.
महाराष्ट्र राज्याला ७२० कि.मीचा समुद्र किनार लाभला आहे. यातील रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी, दापोली, गुहागर तसेच अलिबाग, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील बंदरांची देखभाल दुरुस्ती होत नसल्याने बंदरांच्या दुरावस्थेत वाढ होत आहे.
या बंदरांची देखभाल दुरुस्ती केल्यास या ठिकाणी जलवाहतूक सुरू केल्यास या बंदराच्या आजू बाजूच्या लहान लहान वस्त्याचा विकास तर होईल त्याचबरोबर रोजगारही निर्माण होईल. त्यामुळे या बंदराच्या देखभाल दुरुस्तीसाठी संबंधीत आधीकारी यांना सुचना देण्यात याव्यात, असे निवेदन वायकर यांनी जल वाहूतक मंत्री यांना दिले. तसेच ज्या ठिकाणी बंदर नसेल त्या ठिकाणी बंदराची निर्मिती करण्यात यावी, अशी विनंती वायकर यांनी यावेळी केली.