सोलापूर – देवा भाऊ जो बोलता है, वो करता है, और जो नहीं बोलता, वो डेफिनेटली करता है’ अशा भाषेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली. मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथे मंगळवेढा उपसा सिंचन योजना, पंढरपूर एमआयडीसी, तामदर्डी येथील बंधाऱ्याचे भूमिपूजन व राष्ट्रीय महामार्ग १६६ पर्यंतच्या जोडणाऱ्या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथे मंगळवेढा उपसा सिंचन योजना, पंढरपूर एमआयडीसी, तामदर्डी येथील बंधाऱ्याचे भूमिपूजन व राष्ट्रीय महामार्ग १६६ पर्यंतच्या जोडणाऱ्या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी समाधान आवताडे, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राम सातपुते आणि राजेंद्र राऊत हे आमदार, तसेच माजी खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत तुम्ही महायुतीला १०६वा आमदार दिल्यानंतर आम्ही राज्यात महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन केले. महायुती सरकारने आणलेली ‘लाडकी बहीण योजना’ हे महाविकास आघाडीचे सरकार आले, तर बंद करेल. विरोधक हे समाजात अराजकता निर्माण करण्याचे काम करत आहेत. दरम्यान, मजरेवाडी येथे भंडारा उधळत उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न धनगर समाजातील तरुणांनी केला. या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.