नाशिक – महाराष्ट्रातले उद्योग गुजरात मध्ये गेले असा खोटा अपप्रचार करून उद्योग विभागाच्या संदर्भामध्ये लोकांमध्ये नकारात्मकता पसरली जात आहे असा आरोप करून राज्याचे उद्योग मंत्री उदय सावंत यांनी सांगितले की, यापूर्वीच्या उद्योग मंत्र्यांनी कधीही राज्यातील उद्योगांना प्रगती पथावर नेण्यासाठी पाऊलेच उचलली नाही अशी माहिती आता उद्योजक संघटनांकडूनच समोर येत आहे.
राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे नाशिक मध्ये कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना उदय सामंत म्हणाले की, विनाकारण सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान हे रचले जात आहे. परंतु सरकार प्रगतीपथावर काम करत आहे आणि चांगलं काम करत आहे. याची अनेक उदाहरणं जनतेसमोर आहेत आणि ते आम्ही सांगत आहोत जे खरे केले ते सांगत आहोत खोटं सांगत नाही. परंतु आमचे काही विरोधक हे गुजरातला उद्योग केले असं सांगून अपप्रचार करत आहेत आणि नकारात्मकता सरकारच्या विरोधात पसरवत आहे. उद्योग विभागाच्या विरोधात अशी भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे राज्याचे नुकसान कोण करत आहे हे आता जनतेने ओळखावे.
नाशिक मध्ये येणाऱ्या काळात दोन नवीन उद्योग येत आहेत त्यामध्ये एक डिफेन्सच्या संदर्भामध्ये आणि एक ऑटोमोबाईल चा प्रकल्प नाशिकमध्ये सुरू होणार आहे. तसेच नाशिक मध्ये महेंद्र अँड महेंद्रचा विस्तार होणार असून त्यासंदर्भामध्ये स्वतः आनंद महिंद्रा हे नाशिक मध्ये औद्योगिक संघटना आणि पत्रकारांशी संवाद साधणार आहेत असे सांगून सामंत पुढे म्हणाले, आम्ही कधीच राजकारण केलं नाही पण आम्हाला विनाकारण शक्यता आहे म्हणून राजकारणात ओढले जातं हे चुकीच आहे.