स्वारगेट बलात्कार प्रकरणात डीएनए अहवालाची प्रतीक्षा

0

पुणे : स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी तरुणीवर बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्याविरुद्ध लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. गाडे याची डीएनए चाचणी करण्यात आली असून, चाचणीचा अहवाल पोलिसांना अद्याप उपलब्ध झाला नाही. स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात २५ फेब्रुवारी रोजी आरोपी गाडेने प्रवासी तरुणीवर बलात्कार केला होता. त्यानंतर गाडे पसार झाला. गाडे मूळचा शिरूर तालुक्यातील गुनाट गावचा आहे. पसार झाल्यानंतर गाडे गुनाट गावातील ऊसाच्या फडात लपून बसला होता. तीन दिवसांनी गाडेला तेथून अटक करण्यात आली. बलात्काराच्या घटनेला एक महिना पूर्ण होत आहे. गाडेविरुद्ध लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहे. गाडे याची डीएनए चाचणी करण्यात आली. न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून अद्याप डीएनए चाचणीचा अहवाला मिळालेला नाही,’ अशी माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech