तीन नवे फौजदारी कायदे लागू करू नका! ममता बॅनजींची मागणी

0

नवी दिल्ली – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १ जुलै रोजी लागू होणाऱ्या तीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी पुढे ढकलण्याची विनंती केली आहे. तसे केले तर संसदेला त्यांचे नव्याने पुनरावलोकन करता येईल असे त्या म्हणाल्या. पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात ममता बॅनर्जी यांनी भारतीय न्याय संहिता (बीएनए) २०२३, भारतीय साक्ष कायदा (बीएसए) २०२३ आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) २०२३ या तीन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

१४६ खासदार निलंबित असताना ही तीन विधेयके लोकसभेत मंजूर करण्यात आली आहेत.या विधेयकावर चर्चाच झाली नाही . विशेष म्हणजे या कायद्यातील बदलांना मंजुरी दिली तेव्हा जवळपास १०० सदस्यांना निलंबित केले होते आणि दोन्ही सभागृहातील १४६ सदस्यांना सभागृहाबाहेर काढले होते.अशाप्रकारे लोकशाहीसाठी काळा दिवस असताना त्याच दिवशी ही विधेयके हुकुमशाही पद्धतीने मंजूर केली होती.त्यामुळे आता ही विधेयके फेरआढाव्यास पात्र असून ती संसदेतील नवनिर्वाचित सदस्यांच्या विचारार्थ आणि छाननीसाठी ठेवली पाहिजेत,असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech