डोंबिवलीकरांच्या माझ्यावरील विशेष प्रेमामुळे मी आमदार, मंत्री झालो – रवींद्र चव्हाण

0

डोंबिवली – या शहराने मला भरपूर प्रेम दिल, या सांस्कृतिक, संस्कारमय शहरामुळे मी आमदार झालोय, आता यापुढे राजकारणात वैचारिक समानता आणून या देशाला परम वैभव प्राप्त होण्यासाठी भाजपचे विचार, आचार तळागाळापर्यन्त पोहोचवून पक्ष मजबूत करण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करेल असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.

शनिवारी डोंबिवलीत पालिकेच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात चव्हाण यांच्या जे देखे रवी या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, सुधीर जोगळेकर, मोरया प्रकाशनचे अध्यक्ष दिलीप महाजन, श्रीकांत बोजेवार, श्रीराम शिधये, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, ज्येष्ठ उद्योजक शंकर भोईर, मसापचे डोंबवली शाखा पदाधिकारी सुरेश देशपांडे, श्रीगणेश मंदिर संस्थान अध्यक्षा अलका मुतालिक, संपादक प्रभू कापसे आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर द्वितीय आवृत्तीत सुमारे शंभरहून अधिक लेखकांनी चव्हाण यांच्या कार्यशैली, स्वभाव याबद्दल लिखाण केले आहे. तसेच चव्हाण यांच्या कार्याचा गौरवही लेखांच्या माध्यमातून करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाची पाळमूळ ही त्या पक्ष कार्यकर्त्यांच्या कार्यपध्दतीवर अवलंबून असतात. पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने आलेल्या जनसमुदायावरून चव्हाण यांचे कार्य चांगले सुरू आहे हे स्पष्ट होते असेही विचार मांडण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार जोगळेकर, लीना ओक मॅथ्यू, वरिष्ठ पत्रकार अनिकेत घमंडी आदींची प्रातिनिधिक स्वरूपात मनोगते व्यक्त झाली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech