भारतासह युरोपियन युनियनवर २० टक्क्यांहून अधिक कर
वॉशिंगटन : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत, चीन आणि युरोपियन युनियन सारख्या प्रमुख व्यापारी भागीदारांसाठी नवीन अमेरिकन टॅरिफचा चार्ट जारी केला आहे. व्हाईट हाऊसच्या रोझ गार्डनमधून आपल्या भाषणात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की,”आज आम्ही अमेरिकन कामगारांच्या पाठीशी उभे आहोत आणि आता आम्ही अमेरिकेला प्रथम स्थान देत आहोत.” असे म्हटले. तसेच “आपण खूप श्रीमंत होऊ शकतो, कदाचित जगातील कोणत्याही देशापेक्षा श्रीमंत. यावर विश्वास ठेवणे कठीण आहे, परंतु आपण आता हुशारीने वागत आहोत,” असा विश्वास त्यांनी देशातील जनतेला दिला. पुढे ट्रम्प यांनी घोषणा केली की अमेरिकेत येणाऱ्या जवळजवळ सर्व वस्तूंवर किमान १०% कर लादला जाईल. चार्टमध्ये दाखवलेल्या काही देशांमध्ये आणखी जास्त कर आकारला जाईल” असे म्हटले आहे.
या नवीन शुल्कांना तोंड देणाऱ्या देशांमध्ये, अल्जेरियावर सर्वाधिक ३०% कर लादण्यात आला आहे, तर ओमान, उरुग्वे आणि बहामास यांना १०% कर भरावा लागेल. लेसोथोवर ५०% इतका सर्वाधिक कर लादण्यात आला आहे. युक्रेन, बहरीन आणि कतारवर १०% कर लादण्यात आला आहे, तर मॉरिशसला ४०% आणि फिजीला ३२% कर भरावा लागेल. आइसलँड आणि केनियावरही १०% कर आकारण्यात आला आहे, परंतु लिकटेंस्टाईनला ३७% आणि गयानाला ३८% कर भरावा लागतो. या यादीत १०% करासह हैतीचाही समावेश आहे.
त्यानंतर बोस्निया आणि हर्जेगोव्हिनावर ३५% कर लादण्यात आला आहे, तर नायजेरियाला १४% आणि नामिबियाला २१% कर भरावा लागेल. ब्रुनेईसाठी २४% दर निश्चित करण्यात आला आहे, तर बोलिव्हिया, पनामा आणि इतर काही देशांवर १०% दर लादण्यात आला आहे. व्हेनेझुएलावर १५%, तर उत्तर मॅसेडोनियावर ३३% कर आकारला जाईल. इथिओपिया आणि घाना या दोन्ही देशांवर १०% कर लादण्यात आला आहे. प्रमुख व्यापारी केंद्र असलेल्या चीनने ३४% कर लादला आहे. युरोपियन युनियनला २०% कर भरावा लागतो, तर व्हिएतनाम ४६% कर भरून अव्वल स्थानावर आहे. यानंतर, तैवानला ३२% आणि जपानला २४% कर भरावा लागेल. भारत आणि दक्षिण कोरियावर अनुक्रमे २६% आणि २५% कर लादण्यात आला आहे, तर थायलंडला ३६% आणि स्वित्झर्लंडला ३१% कर भरावा लागेल.
इंडोनेशिया आणि मलेशियासाठी टॅरिफ दर अनुक्रमे ३२% आणि २४% निश्चित केले आहेत, तर कंबोडियाला सर्वाधिक ४९% टॅरिफचा सामना करावा लागतो. दुसरीकडे, युनायटेड किंग्डमवर फक्त १०% हलका कर लादण्यात आला आहे, तर दक्षिण आफ्रिकेला ३०% आणि ब्राझीलला १०% कर भरावा लागेल. बांगलादेशला तब्बल ३७% शुल्काचा सामना करावा लागेल, तर सिंगापूरला फक्त १०% आणि इस्रायल आणि फिलीपिन्सला १७% शुल्क द्यावे लागेल. चिली आणि ऑस्ट्रेलियाला १०% कर सवलत मिळाली आहे, परंतु पाकिस्तानला २९%, तुर्कीला १०% आणि श्रीलंकेला ४४% कर भरावा लागेल. कोलंबिया देखील १०% कर असलेल्या देशांमध्ये आहे, तर पेरू आणि निकाराग्वा यांना अनुक्रमे १०% आणि १८% कर भरावा लागतो. नॉर्वेला १५% कर आकारला जाईल.
कोस्टा रिका, जॉर्डन आणि डोमिनिकन रिपब्लिकवर १०%, २०% आणि १०% चे कर लादण्यात आले आहेत. संयुक्त अरब अमिराती आणि न्यूझीलंड यांनाही १०% कर आकारला जातो. अर्जेंटिना, इक्वेडोर, ग्वाटेमाला आणि होंडुरास यांना १०% कर लावण्यात आला आहे, परंतु मादागास्कर आणि म्यानमार (बर्मा) यांना अनुक्रमे ४७% आणि ४४% कर लावावा लागेल. ट्युनिशियावर २८%, कझाकस्तानवर २७% आणि सर्बियावर ३७% कर लादण्यात आला आहे, तर इजिप्त, सौदी अरेबिया आणि एल साल्वाडोर यांना १०% कर भरावा लागेल. कोट डी’आयव्होअरला २१%, लाओसला ४८% आणि बोत्सवानाला ३७% दराने कर भरावा लागेल. त्रिनिदाद आणि टोबॅगो आणि मोरोक्को हे देश १०% कर आकारणीसह यादीत समाविष्ट आहेत