– राष्ट्राध्यक्ष जो बायडन, पंतप्रधान मोदींकडून निषेध
पेन्सिलवेनिया – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बटलरमधील एका प्रचार सभेदरम्यान जीवघेणा हल्ला झाला. या गोळीबाराचे व्हिडिओ देखील समोर येत आहे. या हल्ल्यात हल्लेखोर सभा स्थानी उभ्या असलेल्या ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला. पण त्याचा निशाणा अवघ्या चार बोटांनी हुकला. ट्रम्प यांच्या उजव्या कानाला गोळी चाटून गेली. त्या अगोदरच स्नायपरने सावध होत शूटर जागीच कोसळला. या हल्लानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध व्यक्त केला आहे.
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या तरुणाला सीक्रेट सर्व्हिस एजंट्सनी जागीच ठार केले. थॉमस मॅथ्यू क्रुक्स असे हल्लेखोराचे नाव होते. तो २० वर्षांचा होता आणि पेनसिल्व्हेनियातील बेथेल पार्क येथे राहायचा. घटनास्थळावरून एक AR-15 सेमी ऑटोमॅटिक रायफल जप्त करण्यात आली आहे. याच रायफलने ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला आहे. या घटनेमुळे अमेरिकेतील राजकारण चांगलेच तापले आहे.
अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत प्रचार शिगेला पोहोचला आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार ट्रम्प बटलरमधील सभेत भाषण करत होते. त्याचवेळी अचानक फायरिंग सुरु होते. पहिल्या गोळीचा आवाज येताच, सभेच्या मंचाजवळ एका उंच ठिकाणी बसलेल्या स्नायपरने हल्लेखोरावर निशाणा साधला. मंचाजवळ १२० मीटर दुरवर एका कंपनीच्या छतावर हल्लेखोर लपून बसला होता. ट्रम्प उभे राहिले त्यानंतर लागलीच त्याने गोळी झाडली. सुरक्षा रक्षक गोळीबारामुळे सावध झाले. मंचाशेजारी उभारलेल्या एका उंच मचाणावर स्नायपरची टीम होतील. त्यातील एकाला हल्लेखोर दिसला. त्याने २०० मीटर अंतरावरुन निशाणा साधला आणि त्याचा खात्मा केला. जर त्याने अजून थोडा उशीर केला असता तर ट्रम्प यांचा जीव धोक्यात आला असता.
अमेरिकन सुरक्षा एजन्सनीचे प्रवक्ते अँथनी गुग्लिल्मी यांच्यानुसार, संशयित हल्लेखोराला स्नायपरने जागीच टिपले. स्नानयपरने त्याच्यावर 200 मीटर अंतरावरुन निशाणा साधला. त्याची गोळी थेट हल्लेखोराच्या डोक्यात घुसली आणि तो जागीच ठार झाला.
एका दुसऱ्या व्हिडिओत गोळी झाडल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी मान हलविल्याने ही गोळी त्यांना न लागता त्यांच्या उजव्या कानाला चाटून गेली. जर त्यावेळी त्यांनी मान हलवली नसती तर गोळी थेट त्यांच्या डोक्यात गेली असती. माजी राष्ट्राध्यक्षावरील या अयशस्वी हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उठले आहेत. हल्लेखोर इतक्या जवळ असताना सुरक्षा यंत्रणांना तो अगोदर कसा दिसला नाही, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.