डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्विकारला कोकण विभागीय आयुक्त पदाचा पदभार

0

मुंबई : कोकण विभागीय आयुक्त पदाचा डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पदभार स्विकारला असून आज सर्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आाढावा बैठक घेऊन कोकण विभागातील कामकाजाचा आढावा घेतला. डॉ. विजय सूर्यवंशी यांची बदली कोकण विभागीय आयुक्त पदावर झाली आहे. यापूर्वी ते राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त पदावर कार्यरत होते. डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दि. २० फेब्रुवारी २०२५ रोजी कोकण विभागाचा पदभार स्विकारला असून, डॉ. सुर्यवंशी हे सन २००६ च्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. त्यांचे शालेय शिक्षण सातारा सैनिक शाळा तसेच नाशिक जिल्हयातील देवळा येथील जिल्हा परीषदेच्या शाळेत पूर्ण झाले आहे. पुढे पी.एच.डी. (व्यवस्थापन), एम.बी.ए.(मार्केटिंग), एल.एल.बी., बी.एस.सी. (फिजिक्स) असे उच्च शिक्षण पूर्ण करुन त्यांनी दि.०९ मार्च २०१२ रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ, मुंबई येथे सह मुख्यकार्यकारी अधिकारी या पदावर रुजू होवून प्रशाकीय सेवेत प्रवेश केला.

दि.११ जुलै २०१३ ते आता पर्यंत मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर, मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पालघर, जिल्हाधिकारी गोंदिया, जिल्हाधिकारी रायगड, कल्याण डोंबिवली महानगर पालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकारण, मुंबई, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क आयुक्त, मुंबई अशा विविध महत्वाच्या पदावर उल्लेखनीय काम केले आहे. आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या उल्लेखनीय कामाबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech