पं.बंगाल, झारखंडमध्ये ईडीची छापेमारी

0

रांची : मतदानाच्या एक दिवस आधी झालेल्या या धाडसत्रामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. झारखंडमध्ये बांगलादेशी महिलांच्या घुसखोरीचा तपास करताना काळ्या पैशाचा भंडाफोड करून ईडीने सप्टेंबरमध्ये मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) गुन्हा नोंदवला होता. बांगलादेशी घुसखोरीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज, मंगळवारी पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये 15 ठिकाणी छापे टाकले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर भाजप नेते झारखंड सरकारवर बांगलादेशी घुसखोरीला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप सातत्याने करत आहेत. झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात बुधवारी 43 जागांवर मतदान होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात 38 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. एजन्सीने दाखल केलेला एनफोर्समेंट केस इन्फॉर्मेशन रिपोर्ट (इसीआयआर) हा झारखंड पोलिसांच्या रांचीमधील बरियातू पोलिस स्टेशनमध्ये जूनमध्ये दाखल केलेल्या एफआयआरवर आधारित आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech