पुणे – मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील दौंड-मनमाड टप्प्यातील पुणतांबा-कन्हेगाव येथे रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करण्याच्या कामामुळे येत्या २८ ते ३० जूनपर्यंत या मार्गावरील आठ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
पुणे-सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस (२८ जून), सीएसएमटी-पुणे डेक्कन क्विन (२९ जून), पुणे-सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस (२९ जून), सीएसएमटी-पुणे डेक्कन एक्स्प्रेस (३० जून ), पुणे-सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस (३० जून) आणि सीएसएमटी-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस (३० जून) या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मध्य रेल्वेने यासंदर्भात एक निवेदन प्रसृत केले आहे. पायाभूत सुविधा अद्ययावत करण्यासाठी कन्हेगाव आणि पुणतांबा दरम्यान दुहेरीकरणाच्या कामाच्या पूर्वतयारीसाठी या मार्गावरून धावणाऱ्या मेल आणि एक्स्प्रेस रेल्वेगाड्या दौंड आणि मनमाडदरम्यान पुणे -लोणावळा-कल्याण-इगतपुरी- मनमाड मार्गे वळविण्यात आल्या आहेत, असे या निवदनात म्हटले आहे.