क्षेपणास्त्र, दारूगोळा वाहून नेणारी आठवी बार्ज एलएसएएम ११ नौदलास सुपूर्द

0

मुंबई : क्षेपणास्त्र आणि दारूगोळा वाहून नेणारी आठवी बार्ज, एलएसएएम ११ (यार्ड ७९) चा समावेश सोहळा शुक्रवारी मुंबईतील नौदल गोदीमध्ये पार पडला. या समारंभाचे प्रमुख अतिथी सीओवाय, एनडी (एमबीआय) कमोडोर राजेश बार्गोटी होते. या बार्जबरोबरच, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्रातील या जहाज बांधणी कंपनीने भारतीय नौदलासाठीच्या सर्व आठ बार्ज करारानुसार नौदलाला सुपूर्द केल्या. आठ एमसीए बार्जच्या बांधणी आणि वितरणासाठी एमएसएमई जहाज बांधणी कंपनी, मेसर्स सेकॉन इंजिनियरिंग प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, विशाखापट्टणम यांच्याशी १९ फेब्रुवारी २१ रोजी करार करण्यात आला होता. या बार्जची रचना भारतीय जहाज डिझाइनिंग कंपनीच्या सहकार्याने स्वदेशी पद्धतीने करण्यात आली असून, समुद्रात तग धरण्याच्या त्यांच्या क्षमतेची यशस्वी चाचणी नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळा (एनएसटीएल), विशाखापट्टणम येथे करण्यात आली आहे.

या बार्ज भारतीय नोंदणी जहाज (आयआरएस) च्या संबंधित नौदल नियम व नियमावलीनुसार बांधण्यात आल्या आहेत. एमसीए बार्ज हे ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या भारत सरकारच्या उपक्रमांचे अभिमानास्पद प्रतीक असून, एमएसएमई क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या भारतीय नौदलाच्या वचनबद्धतेला अधोरेखित करतात. या आठ बार्जपैकी सात बार्ज आधीच नौदलात समाविष्ट करण्यात आल्या असून, त्या भारतीय नौदलात आपापली जबाबदारी पूर्ण करत आहेत. या बार्ज नौदलाच्या विविध प्लॅटफॉर्मवर जेट्टीजवळ तसेच बाहेरील बंदरांवरून साहित्य/दारूगोळा वाहतूक, चढवणे आणि उतरवणे यासाठी मदत करतील.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech