मुंबई- लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. या निवडणुकीत वंचितांच्या मताची टक्केवारीही घसरली. अशात आता राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून तयारीला सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी वंचितने सुद्धा मोठा प्लॅन करत एकला चलोची भूमिका घेतली आहे.
दरम्यान, नुकतीच वंचित बहुजन आघाडीची लोणावळा येथे बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सरसकट उमेदवार देण्यापेक्षा वंचित बहुजन आघाडीची राज्यातील ज्या विधानसभा मतदारसंघात ताकद आहे, अशा मतदारसंघात निवडणूक लढण्याचा वंचितचा प्लॅन असणार आहे. दरम्यान लोणावळा येथे वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीला लोकसभा उमेदवारांसह वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर उपस्थित होते.
यावेळी येत्या विधानसभा निवणुकांबाबत चर्चा झाली त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीची राज्यातील ज्या विधानसभा मतदारसंघात ताकद आहे, असे मतदारसंघ निवडून त्याठिकाणी शक्ती केंद्रित करून लढावे असा निर्णय बैठकीत झाला. दरम्यान येणा-या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस किंवा भाजपसोबत न जाता लोकसभेप्रमाणे वंचित निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.