कोल्हापूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशिल माने, आमदार चंद्रदीप नरके, माजी खासदार संजय मंडलिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे आदी मान्यवर उपस्थित होते. तत्पुर्वी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कोल्हापूर विमानतळावर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशिल माने, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राहूल आवाडे, आमदार अशोकराव माने, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार जयश्रीताई जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.तर, जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले. यावेळी महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे उपस्थित होते.