इलॉन मस्क यांच्या टेस्ला शेअर्समध्ये मोठी घसरण

0

वॉशिंगटन : टेस्ला कंपनीचे प्रमुख इलॉन मस्क यांना गेल्या २४ तासांत मोठा फटका बसला आहे. काही काळापासून इलॉन मस्क यांच्या टेस्ला शेअर्समध्ये मोठी घसरण होत आहे. याणीमुळे मस्क यांची नेटवर्थ २.५ लाख कोटी रुपयांनी कमी झाली आहे. दुसरीकडे, त्यांची कंपनी एक्स( ट्विटर ) देखील तांत्रिक अडचणींचा सामना करत आहे. इलॉन मस्क यांचे टेस्लाचा शेअर सोबतचं मायक्रोब्लॉगिंग कंपनी ट्विटर (आता एक्स) देखील अडचणींचा सामना करत आहे. सोमवारी(दि. १०) एक्स प्लॅटफॉर्म दिवसभरात तीनदा क्रॅश झाले, ज्यामुळे जगात खळबळ उडाली. याचा सर्व्हर यापूर्वीही अनेकदा डाउन झाला आहे, मात्र एकाच दिवसात तीनदा डाऊन होण्याची ही पहिलीच घटना आहे.

शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी यूएस स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण झाली आणि त्यादरम्यान इलॉन मस्कच्या इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे शेअर्सदेखील क्रॅश झाले.हा शेअर १५.४३ टक्के घसरुन २२२.१५ डॉलरवर आला. गेल्या वर्षी डिसेंबर पासून टेस्लाच्या शेअरची किंमत आता ५३% घसरली आहे. टेस्लाच्या शेअरमध्ये झालेल्या मोठ्या घसरणीमुळे नॅस्डॅक निर्देशांक देखील ४ टक्क्यांनी घसरला.गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात टेस्लाच्या शेअर्सने तुफानी वाढीसह $ ४८८.५४ प्रति शेअर हा सर्वकालीन उच्चांक गाठला होता.टेस्लाच्या शेअर क्रॅशचा परिणाम इलॉन मस्क यांच्या नेटवर्थवरही दिसून आला. गेल्या २४ तासांत इलॉन मस्कची एकूण संपत्ती २९ अब्ज डॉलर्स कमी झाली असून, आता ३०१अब्ज डॉलर्सवर आली आहे. या वर्षात आतापर्यंत मस्कच्या संपत्तीत १३२ अब्ज डॉलर्सची घट झाली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech