ठाणे : ठाण्यातील कलादिग्दर्शकउ द्योगपती रवींद्र पालेकर यांचे 6 डिसेंबर रोजी आकस्मिक निधन झाले. रविन्द्र पालेकर 64 वर्षांचे होते. रवी पालेकर यांनी शालेय जीवनात चित्रकलेमध्ये विविध पारितोषिके मिळवून महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले होते. माथेरानमध्ये आनंद रिटस नावाचे तारांकित रिसॉर्ट 1998 मध्ये उभारून मराठी उद्योगपतींमध्ये स्थान मिळविले होते. दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे ते अत्यंत निकटवर्तीय होते. आनंद दिघे यांनी आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांच्या रंगमंचाचे कला दिग्दर्शनाचे काम ते पहात असत. त्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्याकडूनही शाबासकी मिळाली होती. आनंद दिघे यांच्या निधनानंतर काही वर्षे टेंभी नाका येथील नवरात्र उत्सवात ते सजावटीचे काम पाहत होते.