नवी दिल्ली – भारतीय अन्न महामंडळाच्या (एफएसीआय) महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयाकडून तांदुळाची खुल्या बाजारात विक्री सुरू केली आहे. तांदळाचा हा साठा खरेदी करण्यासाठी इच्छुक असलेल्या खरेदीदारांनी एफसीआयच्या ई-लिलाव सेवा पुरवठादार “ एम-जंक्शन सर्विसेस लिमिटेड” (https://www.valuejunction.in/fci/) या ठिकाणी स्वतःची पॅनेलमध्ये नोंदणी करावी आणि साठ्यासाठी बोली सादर करावी.खरेदीसाठी इच्छुक असलेल्या कोणत्याही खरेदीदारासाठी पॅनेलमध्ये नोंदणी करण्याची प्रक्रिया 72 तासात पूर्ण केली जाईल. येत्या 21 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आगामी लिलावात गोवा राज्यासह महाराष्ट्र प्रदेशाकरिता एकूण 20 हजार मेट्रिक टन तांदूळ खुला केला जाणार आहे.
व्यापारी/ मोठ्या साठ्याचे खरेदीदार/ तांदळाच्या पदार्थांचे उत्पादक यामध्ये सहभागी होऊ शकतात. तांदुळासाठी प्रत्येक बोलिदारासाठी बोली लावण्यासाठी किमान एक मेट्रिक टन आणि कमाल 2000 मेट्रिक टनांची मर्यादा आहे. खुल्या बाजारातील विक्री योजनेमुळे वाढणारे भाव नियंत्रणात राहण्यास आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळण्यास मदत होईल.