गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण

0

गडचिरोली : शासनाने सन 2005 पासून जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलिस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकूण 679 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे.. नक्षल सप्ताह दरम्यान जहाल महिला माओवाद्याने गडचिरोली पोलीस व सीआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण केलं. या महिला नक्षलवाद्यावर शासनाने 2 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. तारा ऊर्फ शारदा ऊर्फ ज्योती दस्सा कुळमेथे (वय 28 वर्ष, रा. नैनेर, ता. अहेरी, जि. गडचिरोली) असं या महिला नक्षलवाद्याचं नाव असून तिने आत्मसमर्पण केलं आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech