मुंबई : आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिकेच्या अर्थसंकल्पाचे स्वागत करत प्रतिपादन केले की मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी सादर केलेल्या २०२५-२०२६च्या अर्थसंकल्पात आर्थिक स्थैर्य आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजनावर विशेष भर दिला आहे, ज्यामुळे शहराच्या विकासात्मक गरजा पूर्ण करण्यास मदत होईल.
अनिल गलगली यांनी म्हटले आहे की या वर्षीच्या अर्थसंकल्पात कोणत्याही नव्या मोठ्या प्रकल्पांची घोषणा करण्यात आलेली नाही. प्रशासनाने आर्थिक स्थैर्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. एकूणच, मुंबई महानगरपालिकेच्या या अर्थसंकल्पात बेस्ट उपक्रम, पर्यावरण, पायाभूत सुविधा, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांवर विशेष लक्ष देण्यात आले आहे.
झोपडपट्टी भागातील व्यावसायिक बांधकामांवर कर आकारण्याचा विचार करत आहे. झोपडपट्टी भागात चालणाऱ्या दुकाने, कारखाने, गोदामे आणि इतर व्यावसायिक आस्थापनांवर हा कर लागू होईल. यामुळे पालिकेला अतिरिक्त महसूल मिळेल, असं अनिल गलगली म्हणाले.