अहिल्यानगर महानगरपालिकेतील उबाठा गटाच्या माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

0

अहिल्यानगर : शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल संध्याकाळी अहिल्यानगर महानगरपालिकेतील उबाठा गटाचे माजी नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांनी काल शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यात माजी नगरसेवक दीपक साहेबराव खैरे, माजी स्थायी समिती सभापती दत्ता बाबाराव जाधव, माजी नगरसेवक प्रशांत बाळू गायकवाड, महिला अंबिका बँकेच्या अध्यक्ष शोभना चव्हाण, माजी नगरसेवक आणि शहरप्रमुख दिलीप नानभाऊ सातपुते यांचा समावेश आहे. सदर वेळी शिवसेना सचिव आणि उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख भाऊ चौधरी, पुण्यश्लोक अहिल्यानगरचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे आणि शहरप्रमुख अजित दळवी हे देखील उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech